Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

रावेर प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान नगरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 

याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक माहिती अशी की, शहरात पंचमुखी हनुमान नगर मधील रहिवासी असलेले भारती दिनेश चौधरी या महिलेने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. सकाळी बचत गटाचे सहकारी घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहाचा पंचनामा केला. रावेर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. रावेर पोलिस स्टेशन अकास्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version