Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रावेर प्रतिनिधी । शहरातील विविध भागात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोरोनाच्या महामारीत आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना नियमांचे पालन करून साजरी करण्यात येत आहे. रावेर शहरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होते. दरम्यान जबाबदारी अधिकाऱ्यांनी सर्वांनी मास लावले होते. आजच सायंकाळपासून गर्दी टाळण्यासाठी कोरोनाची ‘ब्रेक दि चैन’साठी लॉकडाउन लावण्यात येणार आहे.

रावेर तहसिल कार्यालय, नगर पालिकेत, ग्रामीण रुग्णालय, रावेर पंचायत समिती, झेडपी बांधकाम विभाग, पोलिस स्टेशन बाजार समिती आदी ठिकाणी कोरोना नियमाचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली.

Exit mobile version