Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

jail11 2017071030

रावेर प्रतिनिधी । मोटारसायकल व्यवस्थीत चालवा असे सांगणाऱ्यास तिघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी शेख रईस शेख यासिन रा.मदिना कॉलनी रावेर यांनी संशयित आरोपी शेख हसन शेख अनवर रा. कुंभारवाडा, रावेर, शेख मतीन शेख ताबिद रा. फत्तेनगर, रावेर आणि सय्यद सोहिल उर्फ छोटू सय्यद रा. लियाकत कोतवाल वाडा यांना मोटारसायलक वस्तीत आरामाने चालवा, म्हातारी माणसे, लहान मुल यांचा अपघात होईल असे समजावून सांगितले. याचा राग तिघांना आल्याने शेख रईस याच्या घरात घुसून मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिली होती. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रावेर पोलीसात तिघांविरोधात गुरनं 181/2019 कलम 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे फरार झाले होते. आज तिघांना अटक करण्यात आली. यातील संशयित आरोपी शेख हसन शेख अनवर याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे. तिघांना हजर केले असता तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासाठी पो.नि. रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तडवी, पो.ना. निलेश चौधरी, पो.कॉ.सुरेश मेढे, पो.कॉ. संदीप पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version