Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले : विवर्‍यातील घटनेने खळबळ

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विवरा येथे पिस्तुलचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तालुक्यातील विवरे बुदुक येथील किशोर पीतांबर राणे यांच्या घरात शिरून चोट्यांनी लुट करून पलायन केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ते लघुशंकेसाठी उठले असतांना अज्ञात चोरट्यांनी कानाला पिस्तुल लाऊन राणे यांना घरात नेले. यानंतर सोन्याचे दागिने व रोकड मागितली. यात कपाटातील २ तोळे सोने, तसेच पंधरा हजार रूपये रोख असा ऐवज त्यांनी सोबत घेतला. यानंतर त्यांनी किशोर राणे यांचे हात-पाय व तोंड बांधून तेथून पळ काढला.

या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर राणे यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरी होते. रात्री लघुशंकेसाठी उठल्यानंतर चोरट्यांनी पिस्तुल लाऊन त्यांना लुटले.

Exit mobile version