Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर महसूल विभागाची अवैध वाळू वाहतूकीवर धडक कारवाई

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर-ट्रॉली महसूल विभागाने मध्यरात्री जप्त केल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. पाल रावेर परिसरातही अशीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अवैध वाळू वाहतूक करणारे तिन ट्रक्टर व ट्रॉली तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली  दि १८ जुलै रोजी रात्रीच्या वेळी महसूल पथकाने जप्त केले आहे.बलवाडी सुकी नदी पात्रातून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई मंडळ अधिकारी खिर्डी, मंडळ अधिकारी रावेर, मंडळ अधिकारी सावदा, मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल, तलाठी बलवाडी, तलाठी शिंगाडी, तलाठी गाते यांच्या पथकाने सापळा लाऊन बलवाडी येथील सुकी नदी पात्रातून विनापरवाना रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले आहे.

Exit mobile version