Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर पोलीस स्टेशनला 53 वाहने बेवारस; संबंधित वाहनधारकांनी संपर्काचे आवाहन

रावेर प्रतिनिधी । रावेर पोलिस स्टेशनला तब्बल 53 वाहने बेवारस असून ज्यांची वाहने चोरीला गेले असतील हरवले असतील त्यांनी खात्री करून घेऊन जाण्याचे अवाहन पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे. 

रावेर पोलिस स्टेशनला असलेल्या बेवारस वाहने पोलिस स्टेशनच्या आवारात आहे. ज्यांची वाहने चोरीला गेले असतील हरवले असतील त्यांनी खात्री करून घेऊन जाण्याचे अवाहन रावेर पोलिसांनी तर्फे करण्यात आले आहे. यासाठी सदर वाहनाचे कागदपत्र सोबत घेऊन यावे यासाठी पोलिस निरिक्षक शितलकुमार, नाईक पोलिस कर्मचारी श्रीराम वानखेडे, निलेश लोहार यांच्याशी संपर्क करण्याचे अवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे रावेर पोलिसांनी केले आहे.

रावेर पोलिस स्थानकाच्या आवारात तब्बल ५३ वाहने बेवारस असुन ज्यांची वाहने हरवले असतील चोरली गेले असतील त्यांनी रावेर पोलिस स्थानकाशी संपर्क करण्याचे अवाहन रावेर पोलिसांनी केले आहे.

 

Exit mobile version