Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात बंदच्या माध्यमातून शहिदांना श्रध्दांजली

रावेर प्रतिनिधी । पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज रावेर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला असून या माध्यमातून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या बाबत वृत्त असे आज सकाळपासूनच रावेर बाजारपेठ बंद असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक, आठवडे बाजार आदींसह इतर ठिकाणची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद करून घटनेचा निषेध करण्यात आला. तर अनेक ठिकाणी निषेध सभा, शोक सभा आयोजन करून सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

बाजार समितीत शोकसभा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव गोपाळ महाजन उपसचिव संतोष तायडे रोहिदास बाविस्कर भागवत अलंकार जयवंत पाटील शरद पाटील अरुण महाजन गोकुळ पाटील, जयपुरी, चेतन पाटील, गफुर तडवी यांच्यासह केळी व्यापारी व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते

राष्ट्रवादीतर्फे निषेध

येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भ्याड हल्ल्याचा निषेध करून आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, समाधान साबळे, विलास ताठे, यशवंत दणके, प्रवीण पाटील आदी राष्ट्रवादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version