Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धमकी देऊन महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

2rapecase 56 1

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केर्‍हाळा बुद्रुक येथील महिलेला धमकी देऊन तिच्यावर शारीरीक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पिडीत महिला ही रावेर तालुक्यातील केर्‍हाळा बुद्रुक येथील रहिवासी आहे. दिनांक २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ती अरुण सुभाष प्रजापती (रा.केर्‍हाळा बु॥ता.रावेर) याच्या घरी डाळ वाळू घालण्याबाबत विचारण्यासाठी गेली होती. याप्रसंगी घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन अरूण प्रजापती याने त्या महिलेस धमकावत शारिरीक शोषण केले.

संबंधीत महिलेने ही बाब पतीला सांगितली. यानंतर त्यांनी रावेर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसारू अरूण सुभाष प्रजापती याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलीस निरिक्षख रामदास वाकोडे आणि एपीआय शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरिक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत.

Exit mobile version