Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईचा बडगा

raver news walu mafia

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. अद्यापपर्यंत कोणताही वाळू लिलाव करण्यात आलेला नाही. यात रावेर महसुल‍ विभागाचे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक करवाई गेल्या आठवड्यापासून सुरूवात केल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यात तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांवर चांगलीच मोहीम राबवित आहे. विन परवाना वाहतूक करणाऱ्यांवर महसूल पथक तुटून पडले आहे. दिवसा, रात्र महसूल पथके आपल्या पथकासोबत गस्त घालत अवैध वाहतूक करणाऱ्यांवर धडक कार्रवाई करत आहे. काल व आज असे दोन ट्रक्टर तहसीलदार यांच्या मार्गदर्शना खाली पकडल्यानंतर आज सकाळी येथील रावेर शहरातील जिल्हा परिषदच्या चहाच्या दुकानावर सर्व वाळू व्यवसाय करणारे जमा झाले आणि केलेल्या कारवायांवर चर्चा सुरु झाली. महसुल विभागाने केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे ढाबे दणाणले आहे.

आज पुन्हा कारवाई
दरम्यान वाळूचा ठेका लवकरात लवकर मिळावा अशी मागणी वाळू वाहतूकदांरांकडून होत आहे. आज पहाटच्या सुमारास महसूल पथकाने रावेर शहरातील सावदारोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर टॅक्टर पहाटच्या सुमारास महसूल पथकाने पकडले आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी मिना तडवी, तलाठी अतुल बडगुजर, एफ.एस.खान, दादाराव कांबळे, भारत वानखेडे यांनी केली आहे.

Exit mobile version