Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकाराच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीचेही निधन; नाईक कुटुंबावर आघात !

रावेर, प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार सतीश नाईक Satish Naik यांच्या पाठोपाठ रात्री त्यांच्या पत्नीचेही निधन झाल्याने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे नाईक कुटुंबावर आघात झाला आहे.

रावेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सामनाचे प्रतिनिधी सतीश नारायण नाईक (वय ५८) Satish Naik यांचे तीन दिवसांपूर्वीच कोविडच्या संसर्गानंतर उपचार घेत असतांना निधन झाले. सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणार्‍या आणि मनमिळावू स्वभावाच्या नाईक यांच्या निधनाने रावेरातून मोठ्या प्रमाणात संवेदना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, सतीश नाईक यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती रेखा सतीश नाईक ( वय ५४) यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. सतीशजींचे देहावसान झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. यातच रात्री दहाच्या सुमारास त्यांचे देखील निधन झाले. या दाम्पत्याच्या निधनामुळे रावेरसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्व. सतीश नाईक यांच्या कुटुंबावरील मायेचे छत्र आता क्रूर नियतीने हिरावून घेतले आहे. या दाम्पत्याच्या पश्‍चात विवाहीत मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मार्च महिन्यात दैनिक सामनाचेच सावदा येथील प्रतिनिधी कैलाससिंह परदेशी यांचे निधन झाले होते. यानंतर एक महिन्याने त्यांच्या पत्नीचे देखील उपचार सुरू असतांना निधन झाले होते. या पाठोपाठ आता रावेर येथील सतीश नाईक आणि त्यांच्या सौभाग्यवतीचे कोरोनाने निधन झाल्याने दोन ज्येष्ठ पत्रकारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Exit mobile version