Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर नगरपालिकेच्या ईपीएफ घोटाळा नाही, रवींद्र लांडे (व्हिडीओ)

raver

रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या ईपीएफ मध्ये घोटाळा झाला नसून, सर्व काही नियमानुसार झाले आहे. नगरसेवक अॅड सुरेज चौधरी यांचे आरोप नगरपालिके तर्फ़े खंडन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, ईपीएफ मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप नुकताच सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. यावर आज रावेर नगरपालिकेतर्फे पत्रकार परिषद घेऊन आरोपाचे खंडन केले. तर ईपीएफ कडून कलम 32 नुसार रक्कम पालिकेकडून वसूल करण्यात येईल परंतू, पालिकेने 2013 च्या कायद्यानुसार ठेकेदारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले, असे यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच नगराध्यक्ष दारा मोहम्मद, नगरसेवक आसिफ मोहम्मद सादिक शेख यावेळी उपस्थित होते.

जसे, 2011 ते 2016 ची ईपीएफ ने 2017 मध्ये 40 लाख 7 हजार 223 रुपये पालिके कडून कलम 32 नुसार वसूल केले. तर पालिकेने 2013 कायद्या नुसार 13 ठेकेदारांची अनामत रक्कम पूर्ण जप्त करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव येथील अशोक सोनवणे यांनी 74 हजार 130, मुक्ताईनगर येथील सचिन भोंबे यांनी 2 लाख 31 हजार 342, ठाणे येथील आरएम इंजिनिअर्स 2 लाख 97 हजार 561, योगराज कन्ट्रकशन 4 लाख 22 हजार 165, अष्टविनायक सहकारी बहुउद्देशीय स्वयं संस्था 3 लाख 12 हजार 660, जळगाव येथील जनहीन फाऊंडेशन 1 लाख 33 हजार 647, शीतल पाटील डोलारखेडा 89 हजार 665, वसंत पाटील 45 हजार 938, रावेर येथील राजेंद्र चौधरी 2 लाख 98 हजार 175 पुन्हा 2 लाख 98 हजार 175, गोपाल लोहार यांनी 1लाख 10 हजार 862, रावेर येथील राजेंद्र चिनावलकर यांनी 3 लाख 98 हजार 676, एस.टी.नाईक 6 लाख 77 हजार 795, खिर्डी येथील जितेंद्र पाटील 12 लाख 30 हजार 468., असे एकूण 40 लाख 7 हजार 222 रक्कम जप्त केली आहे.

Exit mobile version