Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शकील शेख

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील कर्जोद या गावातील ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार शकील अब्दुल शेख यांची  तिसऱ्यांदा तर उपाध्यक्षपदी हाजी सरफराज शेख यांची बनिवड करण्यात आली असल्याची माहिती सरपंच अरुणा महाजन व उपसरपंच नरेंद्र महाजन यांनी दिली.

गावात शांतता राहावी व गाव तंटामुक्त रहावे म्हणून सरपंच अरुणा महाजन व उपसरपंच नरेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेत गाव तंटामुक्त करून गावाला तीन लाखाचा पुरस्कार मिळवून गावाच्या विकासात भर पाडणारे शकील शेख याना तिसऱ्यांदा समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे  या सभेत विविध कामांविषयी चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडलेल्या शंका व सूचनांचे या सभेत निरसन करण्यात आले. गावात वृक्षलागवड, संगोपन, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते दुरुस्ती या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी हाजी अनिस शेख,ग्रामसेविका कविता बोदवडे,सदस्य अशोक वणारे, वेंकट ससाणे, राजेंद्र तडवी, ईश्वर महाजन, विनोद सावळे, अकील खान, रेखा ससाणे, पोलीस पाटील अमोल महाजन, आशिष पाठक  यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शकील शेख यांच्या प्रयत्नाने २०१५/१६ मध्ये गाव तंटामुक्त होऊन शासनाने गावाला तीन लाख रुपयांचा धनादेश रावेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास बाबा काळे यांच्या हस्ते अध्यक्ष शकील शेख व सरपंच याना दिला होता.

 

Exit mobile version