हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

रावेर प्रतिनिधी | शहरातील भर वस्तीत असणार्‍या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याने शेळ्या ठार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरता भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी वन खात्याने दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरात मध्य रात्री अज्ञात हिंस्र प्राण्याने पाळीवर शेळ्यांवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहे.असे हल्ले अनेक दिवसांपासुन होत असून हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.रावेर शहरातील सावदा रोड नजिक मध्य रात्री हिंस्र प्राण्याने पाळीवर शेळ्यांवर जिवघेणा हल्ला केला. यात अनेक शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून असे हल्ले अनेक दिवसां पासुन होत आहे.

याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान हल्ल्याची बातमी मिळताच वनपाल अतुल तायडे घटनास्थळी पोहचले असून अज्ञात हिंस्र प्राण्याचा शोध घेत आहेत. तर, या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content