Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर दरोडा प्रकरणातील आरोपीची ओळख पटविण्याचे आवाहन (व्हिडीओ)

raver news

रावेर प्रतिनिधी । येथील दत्ता अॅग्रो प्रा.ली कंपनीवर दरोडा टाकणाऱ्‍या आरोपींची माहिती देण्याचे जाहीर अवाहन रावेर पोलिसांनतर्फे करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी ३० ते ४० वय-वर्षे असलेले हिंदी भाषा बोलणारे अंगात शर्ट पॅन्ट परीधान केलेले सळपातळ बांध्याचे तोंडाला रूमाल बांधलेले ०७ अज्ञात आरोपीनी दत्त अॅग्रो प्रा. लिमीटेड कं ,भोकरी ता रावेर येथे दरोडा टाकून कंपनीचे ऑफीस , किचन व स्टोअर रूममधील एकूण २ लाख ७९ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल व काही रोख रक्कम दरोडा टाकून चोरून नेला होता.

आरोपीतां बाबत कोणतीही माहिती मिळून आल्यास रावेर पो. स्टे. दुरध्वनी क्र. – ०२५८४ – २५०३३३ स्थानिक गुन्हे शाखा ९८२३०१९७११ वर संपर्क साधावा अवाहन रावेर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्‍याचे नाव गुपीत ठेवले जाणार असून योग्य बक्षिस देण्यात येणार आहे.

Exit mobile version