रावेर भाजपातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रावेर प्रतिनिधी । जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केळी पिक विम्याची रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा विविध मागण्यासाठी रावेर भाजपाच्या वतीने आज (दि.६) रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. 

दिलेल्या निवदेनात, हवामानावर आधारित केळी पिक विमा योजने अंतर्गत सन २०१०-२० वर्षांमध्ये जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांचा तापमान वारा व थंडीमुळे झालेल्या नुकसानीच्या निकषामध्ये समावेश झाला असून शासनाकडून व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंजूर झालेली विमा रक्कम जमा करण्याची मुदत संपली असून आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेली नाही. आधीच नैसर्गिक आपत्नी व लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी होळपळून निघाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक झालेली असल्यामुळे हवामान आधारित केळी पिक विमा योजने अंतर्गत सन २०१ ९ -२० मध्ये निकषात असलेल्या शेतकऱ्यांचे मंजूर असलेली रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. 

तसेच जिल्ह्याभरात अतिवृष्टी व अवकाळी झालेल्या पर्जन्य वृष्टीमुळे शेतकऱ्यांची कापणीवर आलेली पिक व वेचणीवर आलेला कापूस उध्वस्थ झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याचबरोबर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रोहित्र नादुरुस्त झालेले आहे. त्यातील काही रोहित्र दुरुस्त झालेले असून त्यात लागणारे ऑईलचा तुटवडा असल्यामुळे रोहित्र दुरुस्त असून सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यासाठी रोहीत्रांसाठी प्रत्येक फिटरला ऑईल उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाने केली आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, मा.जि.प.उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, जि.प.सदस्य अमित देशमुख, कृ.उ.बा.स.सभापती श्रीकांत महाजन, प्रल्हाद पाटिल, हरीलाल कोळी, राहुल पाटील, शशांक पाटील, राहुल पाटील, मनोहर पाटील, सुनिल चौधरी, अमोल पाटील, ज्ञानेश्वर महाजन, प्रमोद पाटील यांच्यासह आदि उपस्थित होते.

 

Protected Content