Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापी जल पुनर्भरणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार-रोहिणी खडसे

hase

रावेर (प्रतिनिधी)। तापी जल पुनर्भरण योजना (मेघा रिचार्ज) योजना जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. त्याचा डी.पी.आर. तयार असुन लवकरच कामास सुरुवात होणार आहे. यामुळे रावेर तालुक्यातुन वाहणाऱ्‍या भोकर, मात्रान, नागमोळी आणि सुकी नदी रिचार्ज होतील व यामुळे शेती तसेच पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या सूटेल असा विश्वास जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केले.

भाजपाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ आज केऱ्हाळामध्ये आले होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रचार फेरी आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, माजी जि.प. सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्या नंदाताई पाटील, रंजनाताई पाटील, पं.स.सदस्य जितू पाटील, माजी उपसभापती महेश चौधरी, केऱ्‍हाळा माजी सरपंच विशाल पाटील. पी.के.महाजन, योगिताताई वानखेडे, कविता कोळी, धनश्री सावळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद वायकोळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष पवन चौधरी, कृउबा संचालक श्रीकांत महाजन, वासुदेव नरवाडे, मुक्ताईनगर नगरसेवक पियुष महाजन, गोपाळ नेमाडे, हरलाल कोळी, महेश पाटील, रेखा बोंडे, सागर भारंबे, शुभम पाटील, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.

मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला
केऱ्‍हाळा येथे अॅड रोहिणी खडसे सभेला संबोधित करताच त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे प्रमानेच भाषणाला सुरुवात केली आपल्या एकतासाच्या भाषणात त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेला सांगितल्यापुढे वहिनी निवडून आल्यास त्यांच्याकडून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची कायमची समस्या सोडविण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. यावेळी भाषण संपताच नाथा भाऊ प्रमाणे रोहिणीताई सोबत सेल्फी काढणाऱ्‍यांची गर्दी झाली होती.

Exit mobile version