Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात पेढे वाटप करत नवीन सरकारचे स्वागत

raver jallosh

रावेर प्रतिनिधी । येथे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आज शपथविधी घेतलेल्या फडणवीस सरकारचे स्वागत केले.

रावेर भाजपा तर्फे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्या नंतर रावेर मध्ये पटाके फोडून पेढ़े वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष व नियोजन समिती सदस्य पद्माकर महाजन यांच्या कार्यालयाजवळ फटाके फोडुन आनंदात्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरचिटणीस वासुदेव नरवाडे, सरचिटणीस रविंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, ता.सदस्य दिलीप पाटील, ता.सदस्य भुषण महाजन,युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन महाजन, व्यापारी आघाडी अध्यक्ष पप्पु शेठ गिनोत्रा, भगवान चौधरी,रविंद्र महाजन, ईश्‍वर महाजन, राकेश पांडे,अमोल चितोडकर, दिवाकर प्रजापती, गणेश मराठे आदी उपस्थित होते.

Exit mobile version