Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर भाजपा तालुकाध्यक्षपदी राजन लासुरकर यांची निवड

raver bjp talukadhyaksh nivad

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी राजन लासुरकर यांची आज पक्षाच्या सभेत सर्वानुमते निवड झाली. येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये भाजप पक्षाची बैठक संपन्न झाली. इच्छुकांच्या मुलाखतीनंतर लासुरकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखत म्हणून राजन लासुरकर (ख़िरवळ), वासुदेव नरवाडे (विवरे), महेश चौधरी (दसनुर), दिलीप पाटील (रावेर), नितिन पाटील (रावेर), परमेश्वर सोनार (निंबोल), सी.एस.पाटील (रावेर), अॅड.प्रवीण पाचपोहे (रावेर), विकास अवसरमल (ऐनपुर), दुर्गादास पाटील (निंभोरा), पराग पाटील (सावदा), भास्कर बारी (रावेर), रविंद्र महाजन (कोचुर), उमेश महाजन (रावेर) आदी तालुकाध्यक्ष पदासाठी परिचय करून दिला.

यांची होती उपस्थिती
यावेळी बेटी-बचाव-बेटी-पढाव संयोजक राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षाताई खडसे, माजी आ हरिभाऊ जावळे झेडपी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, सभापती माधुरी नेमाडे, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, जिल्हा सरचिटनिस सुनिल नेवे, जि प सदस्य कैलास सरोदे, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, महेश पाटील, विशाल पाटील, गोपाळ नेमाडे, संदीप सावळे यांच्या तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, भाजपा बूथ अध्यक्ष आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

सर्वानुमते झाली निवड
रावेर तालुकाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस होती. तब्बल चौदा जण या पदासाठी इच्छुक होते. परंतु कोअर कमेटी ठरवेल तो निर्णय सर्वांना मान्य असल्याचे इच्छकांनी सांगत तालुका कोअर कमेटीने एकमताने राजन लासुरकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी कोअर कमेटीत सभापती माधुरी नेमाडे यांना घेण्याचा विसर पडल्याने ते कमालीच्या नाराज होऊन त्यांनी आपली नाराजी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे व्यक्त केली.

Exit mobile version