Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी उत्पन्न बाजार समितीतून संजय पाटील यांची सहकारात होणार ‘एंट्री’ !

सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | तालुक्यातील कोचूर येथील प्रगतीशील शेतकरी तथा मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे संजय ब्रिजलाल पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आखाड्यात उतरणार असून यामुळे परिसरात कुतुहलाचे वातावरण निर्मित झाले आहे.

कोचूर येथील ख्यातनाम व्यक्तीमत्व असणारे संजय ब्रिजलाल पाटील यांनी आजवर राजकीय वा सहकार क्षेत्रातील कोणतीही निवडणून लढविलेली नाही. मात्र अगदी ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये कोचूरसह परिसरात ते किंगमेकर म्हणून ओळखले जातात. ते स्वत: पडद्याआड असले तरी त्यांची भूमिका ही कायम महत्वाची मानली जाते. या पार्श्‍वभूमिवर, ते यंदा रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सहकारातील आपली इनिंग सुरू करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून येत्या दोन-तीन दिवसात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संजय ब्रिजलाल पाटील हे कोचूरच नव्हे तर तालुक्यातील मोठे आणि प्रगतीशील शेतकरी आहेत. मराठा समाजातील मान्यवर असणार्‍या पाटील यांना समाजात देखील मोठा मान आहे. यामुळे ते आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सहकारात एंट्री करणार असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

वास्तविक पाहता संजय पाटील यांना कोणत्याही पॅनलमध्ये अगदी सहजपणे स्थान मिळू शकते. तथापि, ते स्वत: नेमके कुणाला प्राधान्य देतात ही बाब देखील लक्षणीय मानली जात आहे. याबाबत ते येत्या काही दिवसांमध्ये आपले पत्ते खुले करू शकतात.

Exit mobile version