Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राऊत यांनी आता तरी कमी बोलावे – शेलार

raut shelar bhet

मुंबई, वृत्तसंस्था | गेल्या १५ दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली असून बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी आता तरी कमी बोलावं अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावला आहे.

 

आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं की, “राऊत यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो. यावेळी केवळ त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यात आली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. वैचारिक मतभेद असले तरी राजकारणात एकमेकांची विचारपूस करनि महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपेरला धरुन आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नव्हता”. पुढे बोलताना त्यांनी राऊत यांनी तब्येतीच्या कारणामुळे कमीच बोलावं, अशी आमची अपेक्षा असल्याचे म्हटले.

सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि सायंकाळी एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ. मॅथ्यू यांनी त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी केली.

Exit mobile version