Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोमय्या विरुद्ध राऊत वाद न्यायालयात

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपचे किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खा. संजय राउत यांच्यातील वाद न्यायालयात पोचला असून सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

शिवसेचे खा. संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून नव्हेतर महिन्यापासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.संजय राऊत यांनी मेधा सोमय्या आणि युवक प्रतिष्ठानवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमय्या आणि राउत यांचा वाद थेट न्यायालया पोचला आहे. सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी खा. संजय राउत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

शिवडी कोर्टात दावा दाखल करण्यात आला असून कोर्टाने आमचा हा दावा दाखल करून घेतला आहे. या दाव्याची सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. संजय राऊत यांनी आमच्यावर युवक प्रतिष्टान असो किंवा अन्य घोटाळ्याचे आरोप केलेत. मात्र आमचा एकही रुपयाचा घोटाळा राउत यांना सापडला नसल्याचे सांगत यावेळी किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर  टीका केली.

Exit mobile version