Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breking News : शेलारांनी घेतली राऊत यांची भेट ; दहा मिनिटं गुप्त चर्चा

Untitled 1 copy 34

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते आशिष शेलार यांनी आज लीलावती रुग्णालयात जात शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, दोघांनी एका विशेष कक्षात गुप्तपणे दहा मिनिटं चर्चाही केली. त्यामुळे शिवसेना-भाजपातील संवाद पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

 

आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांनी देखील राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊत यांची भेट घेतली. दोघांनी एका विशेष कक्षात गुप्तपणे दहा मिनिटं चर्चाही केली. त्यामुळे या भेटीनंतर शिवसेना-भाजपातील थांबलेला संवाद पुन्हा सुरु होऊ शकतो,अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version