Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर पुरवठा प्रकरणी रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात

रावेर, प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाची चौकशीला सुरु झाली असून यासाठी तालुक्यातील सुमारे १४८ रेशन दुकानदारांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले

शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे, या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्कालीन पुरवठा निरिक्षकांची बदली केली. तसेच याप्रकरणात अजुन कोणी कर्तव्यात कसूर केला याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळख असलेले फैजपुर प्रांताधिकारी कैलास कडलक हे चौकशी अधिकारी आहे. तालुक्यात सर्वाधिक चर्चेला जाणारे या प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version