Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी रास्ता रोको आंदोलन : ‘संविधान आर्मी’चा इशारा (व्हिडीओ)

जळगाव मोरेश्वर सोनार | दादर येथील रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नामांतर झालेच पाहिजे या मागणीसाठी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी ‘करो या मरो’ या निर्धाराने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिला.

ते जळगाव येथील पत्रकार भवनात संविधान दिनानिमित्ताने ‘संविधान आर्मी’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे बोलताना दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिनी ‘संविधान आणि आरक्षण बचाव राज्यव्यापी अधिवेशन’ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर अधिवेशनात, ‘संविधान लागू होऊन ७० वर्ष झालीत तरी संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला का देण्यात आला नाही असा केंद्र सरकारला सवाल करत दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य चैत्य भूमि दादर असे नामांतर झालंच पाहिजे या मागणीसाठी सहा डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनी हे नामांतर झालं पाहिजे त्यासाठी ‘करू वा मरू’ हा निर्धार करत दादर रेल्वे स्टेशनवर दुपारी दोन वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतरच आम्ही चैत्यभूमीवर अभिवाद्ननास जाऊ असा निर्धार करण्यात येणार असल्याचा इशारा संविधान आर्मीने पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी प्रदेश महिला संघटक संगिता मोरे, प्रदेश प्रमुख राकेश बग्गण, अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश प्रमुख आरिफ शेख, वकील आघाडी प्रमुख शिवकुमार ससाणे, प्रदेश महासचिव पंकज गायकवाड, प्रदेश महामंत्री हरीश सुरवाडे,आर्मी नेते हिरालाल सोनवणे यासह सविधान आर्मीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

‘संविधान आणि आरक्षण बचाव राज्यव्यापी अधिवेशना’ची रूपरेषा :-

दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिनी ‘संविधान आणि आरक्षण बचाव राज्यव्यापी अधिवेशन’होणार आहे. हे अधिवेशन दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत मलकापूर तालुक्यातील वडगाव धिगी येथे संपन्न होणार आहे.

मलकापूर येथून दुपारी १२ वाजता तिरंगा रॅली निघणार असून वडगाव धिगी, संविधान नगर येथे रॅलीचे विसर्जन करण्यात येईल. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात दुपारी १२ वाजता सविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी सविधान आर्मी वकील आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड.शिवकुमार ससाने असणार आहे. सूत्रसंचालन अॅड. पंकज गायकवाड करतील आभारप्रदर्शन ए.डी.बोदवडे हे करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात डॉ.सुधाताई कांबळे ‘संविधान धोक्यात आहे ‘ या विषयावर या आपल्या विचार हे आपले विचार मांडतील. ‘घटनात्मक आरक्षण धोक्यात आहे’ या विषयावर तिसरे चर्चासत्र होईल सायंकाळी ७ वाजता खुल्या अधिवेशनात संविधानावर आधारित प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन आणि होईल आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत, संविधान, तिरंगा आणि संविधान निर्माते यांच्या वंदनाने होईल. यावेळी 36 जिल्हाप्रमुख व 36 राज्य प्रमुख नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार असून सर्व विभागीय प्रमुखांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सविधान आर्मीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

फेसबुक व्हिडीओ लिंक

Exit mobile version