दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अनुलोम यांच्या माध्यमातून गेल्या २३ फेब्रुवारी २०२१ पासून दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले होते. त्याचे वेळोवेळी स्मरण स्मरणपत्र देऊन देखील शासन व प्रशासनाकडून योग्य हालचाल न झाल्याने आज दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

शासन परिपत्रकानुसार दिव्यांग बांधवांना किमान कागदपत्रांच्या आधारे स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी व त्यावर ३५ किलो धान्याचा लाभ मिळावा, पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत गटविकास अधिकारी यांना जाब ग्रामपंचायत मधील पाच टक्के राखीव निधी चा लाभ दिव्यांग बांधवांना मिळावा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. दरम्यान कोरोना काळात होणाऱ्या आंदोलनामुळे पाचोरा पोलिसांनी दिव्यांग बांधवांना कलम ६८ नुसार ताब्यात घेण्यात आले.

यावेळी त्यांनी पोलीस स्थानाकातच काही काळ ठिय्या आंदोलन केले यावेळी आंदोलकांतर्फे अनुलोमचे विकास लोहार, वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील सह उपस्थित दिव्यांगांशी  समस्यांचे कथन केले. या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तहासिलदार कैलास चावडे यांच्यासोबत भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून शासन निर्णयाप्रमाणे समस्यांच्या सोडवणुकीची लेखी हमी दिली.

यात प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना साठ ते नव्वद दिवसात शासन निर्णया प्रमाणे लाभ देण्याचे तसेच प्राप्त अर्जातील नागरिकांना किमान कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिकांचे वाटप तीन ते चार दिवसात देण्याची लेखी हमी यावेळी देण्यात आले. यावेळी पुरवठा शाखेचे अभिजीत येवले, उमेश शिर्के यांची उपास्थितीत होती. दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. व पोलिस प्रशासनाने आंदोलन कर्त्यांची कलम ६९ नुसार सुटका करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक गणेश चौबे, विजया वसावे, गोपनीय शाखेचे नितीन सूर्यवंशी, सुनिल पाटील, महिला पोलिस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, पोलिस काॅन्स्टेबल दिपक सुरवाडे सह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content