Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सालार नगरातील नागरीकांचे स्पीड ब्रेकरसाठी रास्ता रोको आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सलार नगरातील हलीमा अपार्टमेंटजवळ रॅम व स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी आज सकाळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, इच्छादेवी ते अजिंठा चौक या चौपदरी महामार्गावरील हलिमा अपार्टमेंट लागून असलेल्या रहेमत, खदीजा, हलीमा, मालिक अपार्टमेंट्स सह सुमारे ४५० ते ५०० घरे असलेल्या नागरी वस्तीच्या शालेय विद्यार्थी, महिला, पुरुष व त्यांची वाहने ही वस्तीतून निघत महामार्गाच्या ऍप्रोच रोडच्या माध्यमाने महामार्गाला लागतात. परंतु महामार्गावरील रॅम मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात आले नाही.

वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व झेंडू ठेकेदार कंपनीचे अजय वर्मा व सुजित सिंग हे प्रत्येकवेळी फक्त आश्वासन देतात आणि काम होत नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे व भविष्यात गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच यावर उपाययोजना करण्यात यावी, म्हणून मंगळवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिक यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी मोबाईलद्वारे फारुक शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे यांना  स्पीड ब्रेकर व रॅम्प बसविण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी २१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात येईल, तर  रॅम्पचे काम सुद्धा दोन दिवसात पूर्ण होईल, असं सांगितले. त्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

याप्रसंगी आताऊल्ला खान, उमर शेख, मुस्ताक बादलीवाला, मुस्ताक पटेल, ॲड. अमीर शेख, अनीस शाह, आरिफ शेख, सलीम इनामदार, अलफैज पटेल ,अन्वर खान, जाहिद शाह, अकील मनियार, खालीद खाटिक, सहिद फयाज, खालील शेख, जुबेर देशमुख, हाजी अशरफ, मतीन सय्यद ,शब्बीर सय्यद, आरिफ शेख, इस्माईल शहा, आयशा मुस्ताक, आयेशा शेख, हाजरा शेख, अफसाना तय्यब, सुरय्या असिफ, नसरीन शेख, नसीम शेख, शबाना शेख आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version