Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची धरणगावात बैठक

jalgoan

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत आज दि.22 जुलै रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची बैठक संपन्न झाली आहे.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. त्यांनी तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या आहेत. येणाऱ्या काळात सर्वांनी आपल्या पक्षाची भूमिका लोकांच्या समोर मांडावी. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी थेट मला केव्हाही संपर्क साधा, मी तुझ्यासाठी 24 तास हजर आहे, असे ते म्हणाले. यावेळी, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे विजय पाटील, मोहन पाटील, संभाजी धनगर, रवींद्र पाटील व मनोज पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थितीत होते.

Exit mobile version