Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रसलपूरात तूफान हाणामारी ; दोन जखमी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रसलपूर येथे किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबात तूफान हाणामारी झाली. यात दोन्ही फिर्यादी जखमी झाल्याची घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी रावेर पोलीसात परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, “रसलपूर येथील नबाब शेख (वय ४२) यांचा मुलगा बक-या बांधत असतांना नबाब शेख मुलाला शिव्या देत होता. या वरुन हसनुर बी शेख कुरेशी (वय ५५) यांचा ‘नबाब शेख आपल्याला शिव्या देत आहे.’ असा समज झाला.

याचा राग आल्याने दोन्ही कुटुंबात तूफान हाणामारी झाली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला नबाब शेख यांच्या फिर्यादीवरुन हसनुर शेख, अल्ताफ शेख, ईस्ताक शेख, हंसार शेख अकबर शेख, शबनम शेख यांच्या विरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तर हसनुर बी शेख कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन नबाब शेख, मुस्कान शेख, सायराबी शेख, शफीक शेख, अनिस शेख यांच्याविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोहेकॉ सतीष सानप करीत आहे.

Exit mobile version