Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला एक दिवसाची कोठडी

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शेंगोळा येथील अल्पवयीन बालीकेवर घराशेजारीच राहणार्‍या अनिल सुरेश घोरपडे याने शनिवारी रात्री बलात्कार करून पिडीतेस मारहाण करीत डबक्यात फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

आज सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामनेर न्यायालयाचे विषेश न्यायाधिश लाडेकर यांच्यासमोर आरोपीस हजर करण्यात आले. याप्रसंगी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे यांनी दिली आहे.

Exit mobile version