Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाळेतून परतणाऱ्या मुलीवर नराधमाकडून शेतात बलात्कार

Rape Child crime

 

सोलापूर (वृत्तसंस्था) शाळेतून घरी परतत असतांना एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर शेतात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. मंगळवेढा तालुक्यातील डोणज इथला हा संतापजनक प्रकार आहे.

 

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेडवर इथल्या चिदानंद स्वामी यांच्या शेतात सायंकाळी 5 दरम्यान शाळकरी मुलगी (वय 15) ही शाळेतून घरी जाताना नराधाम रामणणा केदार याने पाठीमागून टॉवेल टाकून तिला शेतातील ऊसामधे ओढत नेले. विरोध केल्यानंतर तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपीवर 363,323 बाललैंगिक अत्याचार कायदे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version