Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात सहकामगारांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence

जळगाव (प्रतिनिधी) कामाचे पैसे घेण्याच्या बहाण्याने दोघांनी एका ४० वर्षीय महिलेवर सामूहीक बलात्कार केल्याची घटना १७ जून रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास घडली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोदावरी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या भारत पेट्रोलियम गॅस कंपनीजवळ एक ४० वर्षीय महिला आपल्या पतीसह राहते. अनिल बबलू राठोड (वय ४०) आणि रोहिदास बाबू राठोड (वय ६०) हे दोघे तिच्यासोबत एका बांधकाम ठेकेदारकडे एकत्र काम करतात. गेल्या वर्षभरापासून त्यांची आपसात ओळख आहे. १७ जून रोजी रात्री ८.३० ते ९.०० वाजेच्या सुमारास ती महिला दुकानावर जात असताना या दोघांनी तिला कामाचे पैसे घेण्यासाठी जाऊ, असे सांगून पेट्रोल पंपापासून ते काशिनाथ लॉजपर्यंत पायी आणले.

त्यानंतर भाजीपाला मार्केटमध्ये एका इमारतीचे काम सुरू असलेल्या निर्जन ठिकाणी नेले, त्यावेळी ते दोघेही दारू प्यायलेले होते. दोघांनी संबंधित पीडित महिलेला बळजबरीने दारू पाजली, त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. १८ जून रोजी सकाळी ४.०० वाजेच्या सुमारास ती शुद्धीवर आल्यानंतर त्यातील एकाने तिला सोबत घेवून भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवर परिसरात आणून सोडले. या घटनेबाबत वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दोघांनी तिला दिली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version