Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रणबीर आणि आलियाची लग्नाच्या तयारीला सुरुवात

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या विवाहानंतर बॉलिवूडची हॉट फेव्हरेट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येत्या १७ एप्रिलला लग्न करणार असल्याचे वृत्त आहे.

हा विवाह चेंबूरमधल्या आरके हाऊसमध्ये पंजाबी पद्धतीनं होणार असून याच ठिकाणी रणबीरचे आई-वडिल ऋषी कपूर आणि नीतू सिंग १९८० साली विवाह बंधनात बांधले गेले होते.

रणबीरच्या लग्नासाठी आरके हाऊसमध्ये तयारी सुरु झाली असून या विवाहास बॉलिवूडमधले मोठे सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version