Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ शिवसेनेतर्फे स्व. गणेश राणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

rana news bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शिवसेना युवासेना व अंगीकृत संघटनेच्यावतीने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.गणेश राणा यांना भुसावळ शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील स्थानिक बागुल निवास, विट्ठल मंदिर वार्ड येथे 26 जुलै रोजी दुपारी ठीक 3 वाजता श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्व. राणा यांच्या कार्याला उजाळा
प्रारंभी त्यांचे सोबत काम करणारे जेष्ठ शिवसैनिक अशोक जाधव, दिवाकर विसपुते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली. यावेळी जेष्ठ शिवसैनिक अशोक जाधव, दिवाकर विसपुते, रेल कामगार सेने चे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, देवेंद्र पाटिल, उमाकांत शर्मा यांनी स्व. गणेश राणा यांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी स्व. गणेश राणा यांच्या सहवासात कार्य केलेल्या जेष्ठ शिवसैनिकाना गहिवरुन आले व सर्वांचे नेत्र पाणावले. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले शिवसैनिक म्हणून मातोश्रीवर राणाजीच्या कार्याची नोंद आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा जिल्ह्यातील दबदबा व नेतृत्व याबद्दल काही निवडक किस्से सांगितले. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पूर्ण जिल्हा पिजूंन काढला होता रात्रदिवस कार्य केले शिवसेना शाखा उघडल्या आंदोलने केली.

स्व.राणा लढवैय्या शिवसैनिक होते. त्यांना अभिमान नव्हता जिल्हाप्रमुख कसा असावा याकरिता स्व.राणा यांचे कार्य व कार्यशैली प्रत्येकाने आचरणात आणावी अश्या महान व्यक्तिमत्व आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे आदर्श व आठवणी सदैव शिवसैनिकाच्या मनात कायम राहतील जिल्ह्यातील शिवसैनिक पोरके झाले असून त्यांचा आधारवड गेला एवढेच नव्हे तर, झुंझार नेतृत्व, निःस्वार्थी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना उपस्थित शिवसैनिकानी व्यक्त केल्या  यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकानी पुष्पांजली वाहून तसेच दोन मिनिट स्तब्ध उभे राहून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख बबलू ब-हाटे, निलेश महाजन, उज्वला बागुल, सूरज पाटील उमाकांत(नमा) शर्मा,राजेश ठाकुर, मिलिंद कापडे, मनोज पवार, पवन बॉक्से, अनिल बागुल, डॉ भरत महाजन, सोनी ठाकुर, नितेश मिश्रा, रोहित महाले, नबी पटेल, यांचेसह भुसावळ शिवसेना युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version