Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राणा दाम्पत्याच्या जामीनावर आज सुनावणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठन हट्ट प्रकरणी राजद्रोहाच्या आरोपाखाली अमरावतीचे राणा दाम्पत्य कारागृहात आहेत, यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

हनुमान चालीसा प्रकरणी राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अमरावतीचे खासदार आणि आमदार राणा दांपत्याला खार पोलिसांनी अटक केली होती, कोठडीत असलेले अमरावतीचे खासदार आणि आमदार राणा दांपत्य हे कारागृहात राहणार कि जामिनावर सुटणार याचा निर्णय आज होणार आहे.

सत्र न्यायालयात शुक्रवारी२९ एप्रिल रोजी त्यांच्या जामिनावर आणि घरचे जेवण मिळण्यासाठी अर्जावर सुनावणी होणार होती, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे शुक्रवारी सुनावणी टळली. तसेच शनिवारी देखील न्यायालयाने २ मे पर्यत निर्णय राखून ठेवला होता. त्यानुसार आज मुंबई सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version