Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात अवैध दारूची सर्रास विक्री : प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात विषारीद्रव्य मिश्रित गावठी दारूची अवैध मार्गाने सर्रास विक्री करण्यात येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष देत कारवाई करावी. अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे.

यावल शहर व तालुक्यातील विविध गावामध्ये मोठया प्रमाणावर सार्वजनिक ठीकाणी मानवी जीवनास धोकादायक असे विषारीद्रव्य वापरून तयार केलेली पन्नीची व गावठी दारूची खुल्लेआम विक्री करण्यात येत आहे. अगदी सहज मिळणाऱ्या तीव्र स्वरूपाचा नशा देणाऱ्या या दारूच्या सामान्य कुटुंबातील मजुरी करणारे तरुण दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले आहे. तर काही तरूण हे व्यसनाधीन होवून गुन्हेगारीकडे वळत आहे.                                          अत्यंत विषारी अशा पदार्थांनी बनविली जाणारी ही पन्नीची व गावटी दारू कायमची बंद व्हावी. यासाठी ग्रामीण पातळीवरील महीलांनी अनेक तक्रारी व आंदोलन केले. असे असतांना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या पन्नी व गावटी दारूच्या अवैध विक्रीवर कुणाचे नियंत्रण राहीले नसल्याचे दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने व स्थानिक पोलीस प्रशासनाने या अनेक सर्वसामान्य महीलांच्या कुटुंबाशी निगडीत अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून तात्काळ ही सर्व अवैध दारूची विक्री थांबवावी. अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version