Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामेश्वर कॉलनी खून प्रकरण : आरोपी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर

crime 4 3

 

जळगाव (प्रतिनिधी) नवरा-बायकोच्या घरघुती वादातून झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना रामेश्वर कॉलनीत संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेसमोर नुकतीच घडली होती. यातील आरोपी गणेश सखाराम भंडारे आज एमआयडीसी पोलिसात स्वतःहून हजर झाला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, रामेश्वर कॉलनी परीसरातील सप्तश्रृंगी कॉलनीत गणेश सखाराम भंडारे आपल्या पत्नीसह कोणत्या ना कोणत्या कारणावरून दररोज भांडण होत होते. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास देखील गणेश हा आपल्या पत्नी भारतीला मारहाण करत होता. यावेळी बाजूला राहणारे योगेश ज्ञानेश्वर जंगले (वय- 37 रा. सप्तशृंगी कॉलनी, मूळ रा. साळवा-नांदेड, ता.धरणगाव) हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेले. संतापलेल्या गणेशने घरातून धारदार शस्त्र योगेशच्या अंगावर येवून म्हणला की, “तुला आमच्या घरातल्या भांडणात यायचा काय संबंध आहे”, असे बोलून योगेशच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत योगेश घराकडे येत असतांना रस्त्यावरच पडला.

 

या घटनेपासून योगेश हा फरार होता. परंतू आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तो स्वत:हून पोलीस स्थानकात हजर झाला. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहम हे एमआयडीसी पोलीस स्थानकात पोहचले असून चौकशी संदर्भात पुढील सूचना देत आहेत.

Exit mobile version