Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रमेश शिंदे यांनी आधीच दिली होती लाचखोरीची माहिती ( व्हिडीओ )

179738 bribe

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांनी आधीच सहसंचालक उच्च शिक्षण विभागातील लाचखोरीबाबत माहिती दिली असून आज एसीबीच्या कारवाईने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या विद्यापीठातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचार्‍यांनी दि. १८ जून रोजी सहसंचालक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. यात विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर सहसंचालक कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, कर्मचार्‍यांची अडवणूक होते असे जाहीर आरोप केले होते. त्यावेळी सहसंचालक सुध्दा उपस्थित होते. मात्र रमेश शिंदे यांच्या आरोपांवर काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे आज याच कार्यालयातील अतुल सहजे या कर्मचार्‍याला आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे अटक करण्यात आली आहे. आता किमान भविष्यात तरी महाविद्यालयीय व विद्यापीठ कर्मचार्‍यांची तसेच प्राध्यापकांची कामे पैसे न देता होतील ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पहा : रमेश शिंदे यांनी आधीच सहसंचालक उच्च शिक्षण विभागाचे काढलेल्या वाभाड्यांचा व्हिडीओ.

Exit mobile version