Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामदेववाडी येथे भरधाव कारची जोरदार धडक; एक जण गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रामदेववाडी येथे पायी जाणाऱ्या एकाला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याबाबत शुक्रवार ६ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तोताराम सदु राठोड रा. रामदेववाडी ता. जि.जळगाव हे ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता रामदेववाडी बसस्थानकासमोर रस्त्याने पायी जात असताना भरधाव कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ३९३३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत तोताराम राठोड ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमी तोताराम राठोड यांचा मुलगा जगदीश राठोड यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार ६ मे रोजी सकाळी कारचालक विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

Exit mobile version