Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खंडेराव नगरात दगडफेक प्रकरणी २९ जणांवर गुन्हा दाखल; सहा जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगर परिसरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून शनिवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली तर पोलीसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगरात शनिवारचा बाजार असतो. त्या बाजार आलेल्या एका मुलीची छेड काढल्याचा प्रकार  शनिवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. या मुलीच्या गटातील एकाने आझाद नगरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, पो.ना. सुशिल चौधरी, पो.ना. प्रविण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस कर्मचारी परिस्थितीची माहिती घेत असतांना दानिश बालिक पिंजारी याने पोलीसांना शिवीगाळ केली. तर जमावातील नागरीकांनी रस्त्यावरील विटा व दगडफेक करण्यात आली होती. यात दोन कर्मचाऱ्यांना दुखापत झाली होती. तर दोन घरांचे नुकसान झाले होत. रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने घटनास्थळी पोलीसांचे कुमक बोलविण्यात आले होते. कुमक पथकाने जमाव पांगविला. आता तणावपुर्ण शांतता आहे.

याप्रकरणी पोहेकॉ संजय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दानिश बालिक पिंजारी, अशपाक खान, रमजान पिंजारी, रेहान शेख, समीर शेख सलीम, अज्जू चावल, अक्तर फरीक मोहमंद पिंजारी, अक्तर दिलेमान पिंजारी, समितर अमिर पटवे, संजय धनगर, सागर कपिल भोई, सनी उर्फ खंडू प्रेमनाथ उमप, राकेश अशोक भोई, विक्की अशोक भोई, विक्की मिठाराम भोई, नाना भोई, यशवंत भोई, बारकू संतोष भोई, समाधान भोई, मुश्ताक इंदू पिंजारी, इम्रान युनूस पिंजारी, गंभीर सरदार पिंजारी, अनिल युनूस पिंजारी, शाहीद रशिद पिंजारी, शाहरूख शेख पिंजारी, आवेश परीद पिंजारी, लखन संतोष भोई , बारकू उर्फ राम संतोष भोई आणि सादीक शेख मुनाफ या २९ जणांवर रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version