Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामखेड येथे राम शिंदे अन् रोहित पवार समर्थकांमध्ये तुफान राडा

fight election

अहमदनगर वृत्तसंस्था । कर्जत-जामखेड मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील बांधखंडक गावामध्ये पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केल्याने दोन जखमी झाले आहेत. यामुळे चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या हल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे व हर्षवर्धन शंकर फुंदे (रा. बांधखडक) हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये वाहनांमधून मतदारांची वाहतूक केली जात आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवाराकडून ही वाहतूक होत आहे. मतदारांना गाडीतून नेण्याच्या वादातून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यातून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने भाजपच्या भालेराव व वनवे यांच्यावर चाकूने हल्ला केला. तोंडावर व हातावर चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी फॉर्च्युनअर कारची तोडफोड केली आहे. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तर दोघा जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Exit mobile version