Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त सेना-भाजपाकडून मिठाई वाटप

यावल ( प्रतिनिधी ) येथील भाजपा व शिवसेनेने संयुक्तपणे आज अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर शिलान्यास सोहळयानिमित्त मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला.

आज यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता अयोध्या येथे झालेला भुमीपुजन सोहळा सर्वांनी दूरचित्रवाणीवरून पाहिला.
या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात आंनदाचे वातावरण असुन, यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार ( मुन्ना ) पाटील व उपसभापती उमेश पाटील यांच्या हस्ते राम प्रतिमेचे पुजन करण्यात आले जय श्रीराम चा जयघोष करून मिठाई वाटप करण्यात आली, याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे , पुंजो पाटील , भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , शिवसेनेचे शरद कोळी , संतोष खर्चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विजय कश्यप आदी कर्मचारी उपस्थित होते .
दरम्यान कृषी उत्पन्न समिती सभापती मुन्ना पाटील यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली व साहेब हवे होते असे भावनिक उदगार काढले.

Exit mobile version