Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात महागाई विरोधात रॅली

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । देशातील सर्वच क्षेत्रात महागाईने उच्चांक गाठला आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते तहसील कार्यालयापर्यंत महागाईच्या निषेधार्थ रॅली काढून यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले असुन पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. घरगुती गॅस दर दररोज वाढत असुन शेतमालाच्या किमतीला भाव कमी व बियाने व खते यांच्या किमती वाढल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रावेर शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, तालुका उपाध्यक्ष विनायक महाजन, सचिव आर. एस. लाहसे, प्रकाश सूरदास,अॅङ योगेश गजरे, रंजना गजरे, संघरक्षक तायडे, राजू सवर्णे, भारत कुँवर, सावन मेढे, भूपेंद्र जाधव, इस्माईल पहेलवान, भाग्यश्री पाठक, मानसी पवार, मिलिंद पाटील इत्यादी कॉंग्रेस पदाधिकारी यांनी महागाई विरुध्द काढलेल्या निषेध रॅलीमध्ये सहभागी झाले. दरम्यान कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या निषेध रॅली मध्ये अपेक्षित कॉंग्रेसचे कार्यकर्ते नव्हते.

 

Exit mobile version