Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रक्षाताई माझी भाची ; मध्यप्रदेश चे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

WhatsApp Image 2019 04 13 at 8.25.11 PM

भुसावळ (प्रतिनिधी ) मध्यप्रदेशमध्ये सरकार स्थापन झाल्यावर 10 दिवसात कर्जमाफी करु असे आश्वासन दिले. आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांनो बऱ्हाणपूरमध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा, कर्जमाफी झाली की नाही ?  कॉंग्रेसची खोट बोलण्याची संस्कृती असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला. ते नांदुरा येथे भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट),  रासप,  शिवसंग्राम,  रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित  भव्य सभेत बोलत होते.

 

तसेच रक्षाताई ह्या त्यांच्या भाची असून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले. याप्रसंगी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना.आ. चैनसुख संचेती,  जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय कुटे,  बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष ना.उमा तायडे,  रावेर लोकसभा संयोजक व जळगाव जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने,  जिल्‍हा संघटन सरचिटणीस मोहन शर्मा,  नांदुरा नगराध्यक्ष रजनी जवरे, नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डीवरे,  रिपाई आठवले तालुकाप्रमुख शैलेश वाकोडे,  समतेचे निळे वादळ अध्यक्ष भाई अशांत वानखेडे,  सूतगिरणी उपाध्यक्ष संतोष मुंढे,   जिल्हा परिषद सदस्य मधुकर वढोदे,  पंस सदस्य प्रभाकर वानखेडे,  पंस सदस्य योगिता गावंडे,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,  रा. स. प. अध्यक्ष भगवान बावणे,  जळगाव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर,  नांदुरा तालुकध्यक्ष शैलेश मिरगे,  नांदुरा शहर अध्यक्ष सुधीर मुर्हेकर,  आरपीआय (आठवले गट) भाऊसाहेब सरदार,  बुलढाणा कोळी,  महासंघ जिल्हाध्यक्ष दहाडसिंग सुरडकर,  भाजपा जिल्हा चिटणीस गणेश भोपळे,  भाजयुमो माजी तालुकाध्यक्ष गजानन चांभारे,  कृउबा माजी सभापती निळकंठ भगत व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  आज याप्रसंगी रक्षाताई म्हणाल्या की,  यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक आहे. आपल्या पक्षाविरुद्ध बहुतेक सर्व पक्ष एकत्र आले आहेत. आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात घेतलेल्या जनहिताच्या निर्णयांमुळे विरोधकांना लढण्यासाठी मुद्दाच राहिलेला नाही. आणखी पाच वर्षे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर राहिले तर आपले भवितव्य संपले हे ओळखून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदींना विरोध करताना आपण राष्ट्रहिताशी घातक खेळ खेळत आहोत याचे भान विरोधकांना राहिलेले नाही. विरोधकांच्या सभा मेळावे होत राहतील. त्यातून होणाऱ्या टिकेकडे अजिबात लक्ष न देता आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यानी सांगितले. यानंतर नांदुरा तालुक्यातील शेंबा बु, टाकरखेड, वडनेर, डिघी, चांदुरबिस्वा या गावांमध्ये प्रचार केला.

Exit mobile version