Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : रक्षाताई खडसे यांना मिळाला ‘या’ मंत्रालयाचा कार्यभार

नवी दिल्ली-वृत्तसेवा | कालच राज्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर आज ना. रक्षाताई खडसे यांना मंत्रालयाचे वाटप करण्यात आले आहे.

आरावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचीत खासदार रक्षाताई खडसे यांनी कालच राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री बनल्या आहेत. काल शपथविधी झाल्यानंतर त्यांना नेमके कोणते मंत्रालय मिळणार ? याबाबत उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी खातेवाटप करण्यात आले आहे.

या अनुषंगाने रक्षाताई खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्री चिराग पासवान हे असून त्यांच्या सोबत रक्षाताई खडसे यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. आज त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

Exit mobile version