Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिक्त कृषी अधिकार्‍यांची पदे भरा- खा. खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । रासायनिक खतांची टंचाई दूर करण्यासह सध्या रिक्त असलेली तालुका कृषी अधिकार्‍यांची पदे तत्काळ भरावी, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

खासदार रक्षाताई खडसे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून विविध मागण्या केल्या आहेत. या म्हटले आहे की, सध्या बर्‍याच भागात चांगला पाऊस झाला असल्याने पिके जोमदार आहेत. चालू हंगामात कृषी केंद्र चालक युरिया आणि संयुक्त खते कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. खते नसल्याचे सांगून विक्रेते परत फिरवत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. शासनामार्फत सर्व खते विक्रेत्यांना युरिया व इतर रासायनिक खते कंपन्यांमार्फत उपलब्ध करून द्यावीत आणि खताचा पुरवठा सुरळीत करून कृषी विभागामार्फत सर्व शेतकर्‍यांना वेळेवर खते उपलब्ध करून द्यावीत.

दरम्यान, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये कृषी अधिकार्‍यांची नियुक्ती नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या अनुषंगाने मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर व पाचोरा येथील तालुका कृषी अधिकारी पदे तत्काळ भरण्याची मागणी देखील खासदार रक्षाताई खडसे यांनी या पत्रात केली आहे.

Exit mobile version