Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या वतीने दिव्यांग बांधवांना रक्षा खडसे व अमोल जावळेंच्या हस्ते कृत्रीम साहित्य वाटप होणार

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचा कार्यक्रम सोमवार २५ डिसेंबर सोमवार रोजी पंचायत समिती मध्ये पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आले आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम,कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत यावल येथे दिव्यांग बांधवांसाठी खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी शिबीर आयोजन करण्यात आले असून खासदार रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप करणार आहेत

मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते, आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज संबंधित कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करणार  आहेत.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभाग जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे, रक्षाताई खडसे, पक्षाचे जेष्ठ उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, रविंद्र पाटील, हरलाल कोळी जिल्हा सरचिटणीस  भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत तालुका सरचिटणीस, हर्षल पाटील सभापती कृऊबा.नारायण चौधरी, तसेच सर्व लोक प्रतिनिधी, सर्व आघाडी प्रमुख ,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व दिव्यांग बांधव लाभार्थ्यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांकडून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version