Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात ध्वजारोहण सह रक्षाबंधन उत्साहात साजरी

jalgaon 3

जळगाव प्रतिनिधी । इन्स्टिट्युट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय, प्रौढ मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळा व विकास तंत्रनिकेतन ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला असून जवानांना राख्या ही बांधण्यात आल्या.

सुरवातीला प्रतिमापूजन, दिपप्रज्वलना नंतर धवाजारोहण व दहावीत उत्तीर्ण झालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे भारताच्या सीमेवर सेवा करणारे दोन जवान (सुरवाडे भाऊ BSF, जगताप भाऊ CRPF सुट्टी वर आले असल्याने त्यांनी खास ध्वजारोहणासाठी उपस्थित असल्याने जवानांना व उपस्थित मान्यवरांना रक्षाबंधन निमित्त प्रौढ मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन ही साजरा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबिका मार्बल व टाईल्सचे संचालक मा. खेमजीभाई पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच हितेशभाई पटेल, ग.स.सोसायटी संस्थापक मा.बी.बी.पाटील, आय.आर.डी.एस.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मा.डॉ.सुरेश पाटील, उपाध्यक्ष मा.एम.एन. महाजन, सचिव मा.डॉ.जे.आर.महाजन, संचालक मा.ई.डी.चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व रोटरी डिस्ट्रीक 3030 चे असिस्टंट गव्हर्नर व पालक मा.डॉ.तुषार फिरके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा.शत्रूघ्न पाटील व पालक मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.

Exit mobile version