Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘राखी कर्तव्याची’ उपक्रमामार्फत जमा झालेल्या राख्या थेट सीमेवर रवाना

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील मैत्री सेवा फाऊंडेशन आयोजित राखी कर्तव्याची या उपक्रमामध्ये जमा झालेल्या राख्या थेट सीमेवर रवाना होणार असून या उपक्रमाला एरंडोलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

शहरात विविध भागात वास्तव्यास असणाऱ्या माता- भगिनींनी व शहरातील सर्व महिला मंडळांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. त्यासोबतच एरंडोल शहरातील माऊली क्लाससेस च्या चिमुकल्या विद्यार्थीनी सुद्धा या कृतज्ञता पूर्वक कार्यात सहभाग नोंदविला.या उपक्रमात ” कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित मुलांचे आणि मुलींचे बालगृह , खडके बु ” या बालगृहाच्या मुलींनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला.

यात सर्व माता-भगिनींनी एरंडोल शहरातील सर्व महिला मंडळांचे अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी आपल्या हाताने हृदयस्पर्शी पत्र लिहिलीत आणि त्या सोबत राखी असे एक पाकीट तयार केले आणि त्यावर आपले नाव व इतर माहिती लिहून ते  संपूर्ण शहरातून जवळपास ६५० पाकीट मैत्री सेवा फाऊंडेशन कडे सुपूर्द केली आणि ते  सर्व पाकीट मैत्री सेवा फाऊंडेशन तर्फे मेजर श्री.विनय पाटील यांच्या हस्ते शिमला बॉर्डर वर ४५० राखी आणि  नेव्ही ऑफिसर अमितसिंग राजपूत यांच्या हस्ते कोची (केरळ)  येथे

नै-सेनेच्या जवानांसाठी २०० राख्या  पाठवण्यात आल्या.या सर्व राख्या लवकरच सीमेवर पोहचवणार आहेत.या कृतज्ञता पूर्वक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Exit mobile version