Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील नदी जोड प्रकल्पाच्या तांत्रिक सल्लागारपदी व्ही.डी.पाटील यांची नियुक्ती

V. D. Patil

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील नदी जोड प्रकल्पाबाबत, उपसा वळण योजना व तांत्रिक बाबी सोडविण्यासाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून माजी राज्य माहिती आयुक्त तसेच सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हि.डी.पाटील यांना तापी, गोदावरी व कोकण खोऱ्यातील विविध नदीजोड प्रकल्पाच्या नियोजनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच विविध ठिकाणी काम केले असल्याने सखोल अभ्यास आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यामध्ये राज्यातील विविध विपुलतेच्या खोऱ्यात तुटीच्या खोऱ्यात अतिरिक्त पाणी वळविण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्प आणि वळण योजना शासनाच्या प्रस्तावित आहे. यासाठी प्रकल्प अहवाला तयार करण्यासाठी राष्ट्रीय जलविकास अभिकरण व वॅपकॉस या केंद्रशासनाच्या संस्था असून त्यांच्या माध्यमातून कामे यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाचे अनुभवी व तज्ञ निवृत्त अधिकारी व्हि.डी.पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version