Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेत पुणे संघ विजेता

pune sangh

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेचा सोमवारी पुणे विरुद्ध बुलढाणा अंतिम सामना होऊन त्यात टायब्रेकरवर पुणे संघाने ३-१ ने विजय मिळवुन २०१९ चा चॅम्पियनशिपवर नाव कोरलेआहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंतिम सामना पाऊस व थरार नियोजित वेळेप्रमाणे शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सकाळी 8:45 वाजता अंतिम सामन्यास सुरुवात झाली. बुलढाणा संघाने नाणेफेक जिंकून क्रीडांगण ताब्यात घेतले. एकूण ८० मिनिटांचा अंतिम सामना खेळला गेला. पाऊस सुरू असताना सुद्धा दोन्ही संघाने कौशल्यपणाला लावत स्पर्धेत थरार निर्माण केला. दोन्ही संघ प्रथमता अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने चॅम्पियनसाठी अत्यंत सडो की मरो प्रमाणे खेळत होते. अंतिम वेळ संपे-पर्यंत कोणताही संघ गोल करू न शकल्यामुळे टायब्रेकरवर हा सामना ३-१ ने पुणे संघाने जिंकला. अर्थातच पुण्याची गोलकीपर अंजली बारके हीचा जिंकण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.

त्याचबरोबर, अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा मान बुलढाण्याची दिपक हिवाळे व पुण्याची सोनाली चेमटे हिने पटकावला. उत्कृष्ट गोलकीपर पुण्याची अंजली बारके, उत्कृष्ट डिफेंडर बुलढाण्याची निकिता जाधव, सर्वात जास्त स्कोर करणारी कोल्हापूरची प्रतिक्षा मिथाई या सर्व खेळाडूंना पारितोषिके व ट्रॅक सूट देण्यात आले. तसेच, विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. त्यात सुवर्ण व रजत पदक, प्रत्येक खेळाडूला एक ट्रॅक सूट व संघाला एक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. विजयी- उपविजयी संघातील खेळाडू यांना मनपा आयुक्त डॉक्टर उदय टेकाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, विफा चे खजिनदार प्यारेलाल चौधरी, पुण्याचे सचिव प्रदीप परदेशी, बुलढाणाचे सचिव एन.आर. वानखेडे, जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख, उपाध्यक्ष अस्मिता पाटील, तसेच स्पर्धेचे प्रायोजक नंदलाल गादिया, अमीर शेख, अंजलीताई बाविस्कर, जफर शेख यांच्या हस्ते अनेक प्रकारचे वैयक्तिक पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कर्णधार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. आयुक्त मनपा डॉ. टेकाळे यांनी जळगाव जिल्हा हा होस्ट असताना सुद्धा जिल्ह्याचा संघ उपांत्यपूर्व पर्यंत येऊ न शकल्याची खंत व्यक्त केली.स्पर्धेची समारोपीय प्रस्तावना फारुक शेख यांनी सादर करून या स्पर्धेत एकूण ८७ गोल झाल्याचे तर 1 खेळाडूस रेड कार्ड मिळाले, 12 येलो कार्ड, 21 उत्कृष्ट खेळाडू व 10 उत्तेजनार्थ खेळाडू ना बक्षीशे बाबत माहिती दिली. संघटनेच्या उपाध्यक्ष डॉ. अस्मिता पाटील यांनी आभार व्यक्त केले. तर सरिता खाचणे यांनी सूत्र संचालन केले.

Exit mobile version